स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले तर आहेतच.शिवाय अनेक ठिकाणी रस्ता खणून व्यवस्थित मुजवला नसल्यामुळे वाहने रस्त्यात खचून अडकून पडत आहेत.सोमवारी सकाळी एक वाळू नेणारी ट्रक भर रस्त्यात रुतून बसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.दुपारपर्यंत ही ट्रक हलविण्यात आली नव्हती.
रविवारी देखील याच ठिकाणी दोन वाहने रस्त्यात अडकून बसली होती.अखेर क्रेन आणून रुतलेली वाहने बाहेर काढण्यात आली.त्यामुळे वाहन मालकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला.रुतलेले वाहन काढण्यासाठी वाहन मालकांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.याला कारणीभूत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे.
![Spm road traffic](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200203-WA0182.jpg)
एसपीएम रोडवरील एका बाजूने रस्त्याचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यातून अधिक कालावधी उलटला आहे.दुसऱ्या बाजूचे पाईप घालण्याचे काम रेंगाळत असल्यामुळे एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे.संचायनी सर्कल ते गोगटे सर्कल पर्यंतच्या रस्त्यावर देखील एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे.त्यामुळे वाहनचालकांना अनेक ठिकाणी वळसा घालून जावे लागत आहे.रस्ता ओलांडताना देखील वाहन वर घेताना अनेक जण पडण्याच्या घटना दररोज अनेक ठिकाणी घडत आहेत.
रस्ते खणल्यामुळे रस्त्यावर लाल माती तशीच असल्यामुळे एखादे वाहन माती उडून लोकांच्या अंगावर धुरळा उडत आहे.
सहनशील बेळगावकर जनतेच्याया सहनशीलतेची स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी घेत आहेत काय असा प्रश्न जनता विचारत आहे. बेळगाव मनपा, बेळगाव स्मार्ट सिटी अधिकारी माझा तुमच्यावर भरोसा न्हाय असे म्हणण्याची वेळ आली आहे.