कंत्राटदाराच्या पैशावर ग्रामपंचायत सदस्यांची टूर
तालुक्यातील पूर्व भागात एका कंत्राटदारांच्या पैशावर ग्रामपंचायत सदस्य टुर काढण्याची प्रथा मागील काही वर्षापासून पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य नेमके कुणाच्या छत्रछायेखाली काम करत आहेत? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कंत्राटदाराने मात्र बक्कळ माया जमवली असून याबाबत सभ्रम निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत अध्यक्ष ग्राम विकास अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मिलीभगतमुळे गावातील अनेक कामे केवळ त्यात कंत्राटदाराला देण्यात येत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. अनेक ग्रामपंचायत सदस्यही कंत्राटदाराच्या शब्दाबाहेर नसल्याचे चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कंत्राटदाराची कामे करण्यास सुरुवात केली आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणार्या काहींनी याला विरोध केला होता. मात्र मनमानी कारभार करत त्यांच्यावर दमदाटी करण्याचे प्रकार घडले आहेत. तालुक्यातील पूर्व भागातील कंत्राटदार सध्या जोमात असून मनमानी कारभारावर अधिक भर देण्यात येत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे याला चाप बसण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वेळीही याच भागातील काही सदस्यांनी सहल काढली होती. त्यामध्येही कंत्राटदारांचे पैसे घेऊन ती सहल काढण्यात आल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. आता अनेक सहलीही संबंधित कंत्राटदाराच्या पैशावर सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे अनेक गोंधळ झाल्याचाही माहिती मिळाली आहे.