खानापूर तालुका रहिवासी संघटनेतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त वरेरकर नाट्यगृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या गड किल्ले छायाचित्र प्रदर्शना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन नियती फोंडशेनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना मुंबईत येथील दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी गड किल्लांच्या संवर्धनाची गरज असुन 14 वर्षांपासून गड किल्ले व इतर स्मारकांच्या संवर्धनासाठी कार्य करित आहोत यामध्ये बेळगाव आणि इतर भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत बेळगाव भागातील किल्लांच्या संवर्धनाची गरज आहे असे मत व्यक्त केले.
प्रारंभी डॉ सरनोबत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर गुंजी येथील किसन चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यास आहे. संघटनेचे अध्यक्ष पी. जे. घाडी यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले
माजी अध्यक्ष प्रेमानंद गुरव, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम, उपाध्यक्ष विनायक घोडेकर, सुहास शहापूरकर, आर आर कुडतूरकर आदी उपस्थित होते मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन तर सुरेश कळ्ळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रतीक गुरव, अभिजित अष्टेकर, सागर मुतकेकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सकाळपासूनच गड किल्ले छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे।.