आर्थिक अडचणीसह पुष्कळश्या अडचणींमुळे मार्कंडे सहकारी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरू करण्यास थोडा विलंब झाला असला तरी सदर साखर कारखाना सुरू करण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न मी आज प्रत्यक्षात साकार केल्याने मला अतिशय समाधान वाटत आहे, असे भावुक उदगार मार्कंडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी काढले.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामातील साखर पोती पूजनाचा कार्यक्रम येत्या 19 फेब्रुवारी रोजी माजी पंतप्रधान एचडी देवे गोवडा यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या अनुषंगाने सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार बोलत होते. तू काहीही कर परंतु बेळगाव परिसरातील ऊस उत्पादकांच्या उत्कर्षासाठी मार्कंडेय साखर कारखाना सुरु झालाच पाहिजे असे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते. आज देवाच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने मी माझ्या वडिलांचे सदर साखर कारखाना सुरू करण्याचे स्वप्न पुरे करू शकलो. तसेच यासाठी मी सर्व भागधारक व चिंतक यांचे आभार मानतो मार्कंडे साखर कारखान्याच्या उभारणीत कोणीही विरोध केल्याने लोकांनी फार मोठा विश्वास आमच्यावर ठेवला त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे तसेच भविष्यात हा साखर कारखाना ऊस उत्पादक तसेच समस्त जनतेच्या विश्वासास पात्र ठरावा या दृष्टीने मी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन अविनाश पोतदार यांनी दिली.
71 हजार टन पैकी बेळगाव तालुक्यातील 18 हजार टन ऊस या हंगामात गाळप झाल्याचे देखील त्यांनी सांगत पुढील वर्षी हा आकडा वाढेल असे स्पष्ट केलं.
याप्रसंगी मार्कंडे साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ॲडिशनल रजिस्ट्रार एमडी मल्लुर अनिल कुट्रे,पिंगट, कोलकार, बसवराज घाडगे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत प्रसंगी कारखाना नोकर भरती बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यवस्थापकीय संचालक एम.डी. मल्लूर यांनी सध्या कंत्राटी पद्धतीने कारखान्यात नोकरभरती केली जात असल्याचे स्पष्ट केले. बाहेरील एजन्सीच्या मदतीने ही नोकरभरती केली जात असून कारखाना जोपर्यंतक सक्षम होत नाही तोपर्यंत दरवर्षी पात्र एजन्सीजना नोकर भरतीचे कंत्राट दिले जाईल, असे मल्लुर यांनी स्पष्ट केले.