Wednesday, May 1, 2024

/

शासनाला ताळ्यावर आणण्यासाठी शेतकरी काढणार विराट चाबूक मोर्चा

 belgaum

गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाला जागे करण्यासाठी येत्या काही दिवसात जनावरे बैलगाड्या ट्रॅक्टर ट्रेलर आणि कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट चाबूक मोर्चा काढण्याचा निर्णय बेळगाव जिल्ह्यातील रयत संघटना आणि समस्त शेतकऱ्यांनी घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये आज गुरुवारी झालेल्या शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत चर्चेअंती जिल्हाधिकारी कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. तसेच या ठरावा प्रमाणे तात्काळ तयारीला लागण्याचेही ठरले. बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्याकडे शासन, अधिकारी तसेच संबधित लोकप्रतिनिधी कानाडोळा करत असल्याने समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहेत.

बेळगाव परिसरातील पीकाऊ शेतीतून बेकायदेशीरपणे होत असलेला हालगा-मच्छे बायपास रद्द व्हावा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई त्वरित मिळावी, सामन्य शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळावा, अनेक वर्षापासून बेळ्ळारी नाल्यातील गाळ न काढलयाने पुराने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, शिवारातील विद्यूत समस्या सोडवून उन्हाळ्यात जादा वेळ विद्यूत पुरवठा द्यावा, शिवारातील तलाव गाळाने भरलेत ते खुदाई करुन तलाव भरणा योजना अंमलात आणावी आदी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. तथापि आजतागायत या मागण्यापैकी एकाही मागणीची व्यवस्थित पुरता झालेली नाही.

 belgaum

हा एकंदर प्रकार पाहता शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करून शेतकऱ्याला पूरता संपवण्याचे षडयंत्र रचलेल्यानां ताळ्यावर आणण्यासाठी येत्या कांही दिवसात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकरी, बैलगाड्या, गूरं, ट्रॅक्टर आणि कुटूंबासहित काढून धडकी भरवण्यासाठी चाबूक मोर्चा काढण्याचा एकमुखी ठराव बेळगाव जिल्हातील रयत संघटना व शेतकऱ्यांच्या आजच्या बैठकित करण्यात आला. सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटना व हरितसेनेचे पदाधिकारी व सदस्य या चाबूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे ठोस आश्वसनही मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. चाबूक मोर्चाचे लवकरच आयोजन करण्याच्या दृष्टीने आतापासूनच नियोजनाची तयारी सूरु झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.