मनपा समोर कधी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत बसून आंदोलन तर कधी मनपा सभागृहात अनोखे आंदोलन करून चर्चेत राहिलेले बेळगाव मनपाचे माजी नगरसेवक डॉ दिनेश नाशिपुडी यांनी मंगळवारी देखील अनोख आंदोलन करून चर्चेत आले आहेत.
बेळगाव मनपाच्या अखत्यारीत येणाऱ्या बसवनकोळ या जल शुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी महा पालिके समोर आंदोलन केले आहे.बर्फाच्या लादीवर तब्बल दहा मिनिटं झोपून त्यांनी हे आंदोलन केले.
सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी हे आंदोलन केले मनपा अभियंत्यांनी भेट घेत त्यांच्या निवेदनाची स्वीकार केला अश्या पद्धतीनं अनोखं आंदोलन करत मनपा अधिकारी व जनतेचे लक्ष त्यांनी वेधून घेतलं आहे.
बसवणकोळ जलशुद्धीकरण प्रकल्प घोटाळा नाशिपुडी यांनी उघडकीस आणला होता याबाबत अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन झाली होती त्यांनी चौकशी केली त्या चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते मात्र याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पास भेट दिली होती मात्र भ्रष्टाचाराची चौकशी केली नव्हती या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी त्यांनी अनोखं आंदोलन हाती घेतल होतं.