कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प येथील केंद्रीय विद्यालयासमोरील तुंबलेल्या ड्रेनेजच्या ‘बेळगाव लाईव्ह’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल बोर्डाचे सक्रीय सदस्य साजिद शेख यांनी घेतली असून संबंधित ड्रेनेज दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कॅम्प येथील केंद्रीय विद्यालय शाळेसमोरील इंडिपेंडन्स रोड येथील ड्रेनेज तुंबून सांडपाणी आणि घाण केरकचरा रस्त्यावर वाहत होते. तुंबलेला ड्रेनेज झाकण फुटल्यामुळे ओसंडून वहात होता. परिणामी या रस्त्यावर सांडपाण्याची तळेच निर्माण झाले होते. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच याठिकाणी दुर्गंधीचे वातावरण पसरले होते. इंडिपेंडन्स रोड या रस्त्यावर केंद्रीय विद्यालय ही शाळा आहे. या शाळेत रविवार वगळता दररोज ये – जा करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसह ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांना या फुटलेल्या ड्रेनेजचा मोठा त्रास होत होता. यासंदर्भात बेळगाव लाईव्हने वृत्त प्रसिद्ध करून गुरुवारी आवाज उठविला.
सदर वृत्ताची कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सक्रिय सदस्य साजिद शेख यांनी तात्काळ दखल घेऊन केंद्रीय विद्यालय येथील ड्रेनेजच्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी तेथे पाहणी केली असता अवजड वाहन ड्रेनेजवरून गेल्यामुळे त्याचे झाकण फुटून सांडपाणी रस्त्यावर वहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेंव्हा त्वरित कार्यवाही करताना साजिद शेख यांनी संबंधित खात्यांना ड्रेनेजची साफसफाई करण्याबरोबरच त्याची दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. तसेच बेळगाव लाईव्हशी संपर्क साधून इंडिपेंडन्स रोडवरील ड्रेनेज अवजड वाहनांमुळे फुटले असून त्याची त्वरित दुरुस्त केले जाणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट तर केलेच शिवाय फुटलेल्या ड्रेनेजची बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारही मानले.
दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांनी कॅम्प येथील केंद्रीय विद्यालय नजीकच्या इंडिपेंडन्स रोडवरील फुटलेल्या ड्रेनेजची तात्काळ दखल घेतल्याबद्दल पालक विद्यार्थी आणि आणि या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तसेच इतर नगरसेवकांनी साजिद शेख यांचा आदर्श घेतला पाहिजे असे मतही काहींनी व्यक्त केले.
ड्रीनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने याचा त्रास केंद्रीय विध्यालय विद्यार्थी व ये जा करणाऱ्या अनेकांना होत आहे मात्र नगरसेवक साजिद शेख यांच्या प्रयत्नामुळे रस्ता स्वच्छ झाला आहे.
ही आहे गुरुवारी बेळगाव लाईव्ह ने पोस्ट केलेली बातमी ज्याची दखल घेण्यात आली आहे