सोमवारी सायंकाळी किल्ला तलावात अनोळखी मृतदेह सापडला आहे त्यामूळे किल्ला तलाव हे दिवसेंदिवस सुसाईड पॉईंट होत आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मार्केट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निळे शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केलेला अंदाजे 50 ते 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे या व्यक्ती बद्दल माहिती समजल्यास मार्केट पोलिसांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या इसमाने आत्महत्या केली आहे का आणखी काही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
अलीकडे किल्ला तलाव परिसरात आत्महत्याचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.