Friday, November 15, 2024

/

बेळगाव विमान तळावर पोहोचल्यावर खर्गे काय म्हणाले?

 belgaum

निवडणुकीत जय पराजय असतोच मात्र निवडणुक जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे धर्माच्या नावावर भाजपने प्रचार केला त्याला जनतेने प्रतिसाद दिला नाही तोड फोडीच्या राजकारणाला जनतेने धडा शिकवला आहे असा टोला काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला.

गुरुवारी बेळगाव विमान तळावर आले असता माध्यमाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीतील काँग्रेसच्या पराभवाची चर्चा राष्ट्रीय वर्किंग कमिटीत होईल गुलबर्गा मध्ये मी अनेक विकास कामे केली आहेत या भागाला घटनेत तरतूद करून विशेष स्थानमान दिले आहे रेल्वे मार्ग डबा कारखाना सुरू केला आहे कोणताही कलंक नसताना काम केलंय असे ते म्हणाले.

Kharge
Mallikarjun kharge file photo

विकास कामे नसताना काही जण सत्तेवर येत असतात लोकांना भावनेत गुंतवून मोदी सरकार दोन वेळा सत्तेवर आले आहे इतकेच काय तर अपप्रचार करून देखील त्यांनी सत्ता हस्तगत केल्याचा आरोप खर्गे यांनी केला.

सांगलीत होणाऱ्या युवा काँग्रेसच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मी जात असून या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत.कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाची निवड देखील लवकर होणार असल्याचे ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.