कर्नाटक राज्योत्सव दिनी काळा पाळणाऱ्या विरोधात सरकारनें देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे कर्नाटक राज्य सीमा संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के एल मंजुनाथ यांनी म्हटलं आहे.
1956 नंतर सीमा भागात जन्म घेतलेले सर्वजण कर्नाटकचे आहेत त्यांना कर्नाटक सरकार सर्व सुविधा देत आहे असे असताना राज्य विरोधी घोषणाबाजी करणे कायद्याच्या चौकटी बाहेर आहे.सरकारने अश्या राज्य विरोधी कार्यक्रमांना परवानगी देऊ नये जर का कार्यक्रम झाला राज्य विरोधी घोषणाबाजी झाल्यास अश्यावर देश द्रोहाचा सेक्शन खाली खटला दाखल करावा असेही हाय कोर्ट निवृत्त न्यायाधिश मंजुनाथ यांनी म्हटले आहे.
बेळगावात कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न आणि गोवा कर्नाटक पाणी प्रश्न यावर बैठक झाल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केलं आहे.सध्या सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे काळा दिन राज्य विरोधी घोषणाबाजी आणि सीमा प्रश्न याचा काहीही संबंध येत नाही.कोणताही व्यक्ती या राज्यात जन्माला येऊन या राज्याच्या विरोधात घोषणा देत असेल तर तो गुन्हा आहे राज्य सरकारने अश्या कार्यक्रमावर बंदी आणावी असेही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या 56 वर्षा पासून बेळगाव सह सीमा भागात केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाच्या विरोधात काळा दिन सुतक दिन म्हणून पाळला जातो.लोकशाही मार्गातून सुरू असलेल्या या आंदोलनाला देश द्रोहाची किनार देण्याचा प्रयत्न होत आहे का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.