बेळगावचे अव्वल सायकलपटू महेश चौगुले याने अविस्मरणीय कामगिरी करताना ऑडेक्स इंडिया रॉनड्डोनिअर्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या २००, ३००, ४०० आणि ६०० की मी च्या चारही टप्प्यातील सायकल स्पर्धा निर्धारित वेळेआधी पूर्ण करून सुपर रॉनड्डोनिअर्स हा सर्वोच्च किताब पटकाविला.
यापैकी २०० की मी ही स्पर्धा बेळगावमध्ये तर ३००, ४०० , ६०० की मी हुबळी मध्ये पूर्ण करण्यात आली. महेश चौगुले हे वेणुग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य आहेत. वरील स्पर्धेसाठी त्यांनी कसून सराव केला होता.
स्पर्धेदरम्यान त्यांना वेनुग्राम क्लबच्या सदस्या चे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले प्रदूषण मुक्त भारत आणि आरोग्यदायी जीवनसाठी दैनदिन जीवनात सायकलचा वापर करण्याचा संदेश महेश चौगुले यांनी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवक वर्गाला दिला आहे.