Thursday, May 2, 2024

/

अलतगा येथील बारमुळे शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढच

 belgaum

अलतगा क्रॉसवर सुरू करण्यात आलेल्या बियरबारमुळे अनेकांच्या त्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली असून शेतकऱ्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तळीराम दारू ढोसून बाटल्या मात्र शेतात फेकून देण्याचे प्रकार वाढीस लागल्याने अनेक आतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा बार बंद करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तळीराम दारू ढोसून शेतातच बाटल्या फोडण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी व जनावरांना काम करताना त्याचा पायाला काचा लागून जखमी होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. प्रारंभापासूनच बार नको अशी मागणी होती. मात्र काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने ह्या नाक्यावर बार स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हा बार बंद करावा अशी मागणी व्यक्त होत आहे.

कडोली रस्त्यावर बार आणि हॉटेलची संख्या वाढली आहे. त्यामुळे काही तळीराम दररोज या ठिकाणी येऊन परिसरातील शेतात मध्ये बसून त्या बाटल्यात तेथेच फेकून देऊन मटणावर ताव मारताना दिसून येत आहेत. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत असून बाटल्या गोळा करण्यात शेतकऱ्यांचा वेळ जाऊ लागला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या बारचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

 belgaum

याचबरोबर या भागात प्लास्टिक ग्लास बाटल्या यांचा एकच पडला आहे. या साऱ्या प्रकारामुळे शेतकरी वैतागला असून ही समस्या सोडवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा व येथील बार बंद करावे अशी मागणी होत आहे. मात्र काही राजकीय नेत्यांनी कारभार चालू ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले असून आता परिसरातील नागरिकांतून याला विरोध होता ना दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच याबाबत मोर्चा काढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.