शरीर स्वास्थ हे कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी महत्वाचे असून स्वछंदी आणि आनंदी मन ठेवण्यासही खेळ महत्वाचा आहे. निरंतर सराव चालू ठेवून योग्य मार्गदर्शनाने उदिष्ट गाठता येतं असे मत जगविख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. अनंत जोशी यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील बालिका आदर्श विद्यालयाने आपले विविध कार्यात अग्रेसर असे स्थान मिळविले असून शाळेच्या शिरपेचात आणि एक मानाचा तुरा म्हणजे टर्फ क्रीडा संकुल उभा केले असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनाप्रमाणे त्याची बांधणी केली आहे. अत्याधुनिक सोयीनी युक्त असलेल्या या क्रीडांगणाचे उद्धाटन थाटात संपन्न झाले. हे कार्य बीटा स्पोर्ट्सच्या सहकार्यातून तयार झाले आहे. हा उद्धाटन सोहळा जगविख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. अनंत जोशी यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
जोशी पुढे म्हणाले की राष्ट्रीय स्तरापर्यंत बालिका आदर्श विद्यालयाच्या मुली पोहचल्याचा आनंद तर निश्चित आहे. पटसंख्या देखील मराठीला प्रेरणा देणारी ही शाळा आहे. परीक्षेच्या वेळी असं अन्न वर्ज नसतं तसा खेळाचा सरावही वर्ज करू नये. अत्याधुनिक या क्रीडा संकुलाचा उपयोग करून आंतर राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू बालिका आदर्श विद्यालयात नक्की घडतील अशी अपेक्षा जोशी यांनी उद्धाटनपर बोलताना इच्छा प्रकट केली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि मार्कंडेय साखर कारखाण्याचे चेअरमन अविनाश पोतदार, शाळेचे चेअरमन गोविंद फडके, उपाध्यक्षा रोहिणी गोगटे, सचिव माधुरी शानभाग, बीटा स्पोर्ट्सचे रविंद्र बिर्जे, सह सचिव आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन.ओ. डोणकरी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थीनींच्या प्रार्थना आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक चेअरमन गोविंद फडके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत आनंद गाडगीळ यांनी केले. दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरानां पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन चेअरमन गोविंद फडके आणि रोहिणी गोगटे यांनी गौरविले.
अविनाश पोतदार यांनी शाळेच्या संचालक मंडळाचं आणि शिक्षक वर्गाचं कौतुक केलं. सोयी केल्या तरी करून घेणं महत्वाचं असून ते इथं होणार याची खात्री आहे असे ते म्हणाले.बीटा स्पोर्ट्सचे रविंद्र बिर्जे यांनीही उत्कृष्ठ योगदान देण्याची ग्वाही दिली. पाहुण्यांच्या हस्ते तुळसी पूजन ही करण्यात आले. यावेळी किणये गावची कुस्तीपट्टू शितल पाटील हीचा सत्कार करण्यात आला यावेळी बेळगांव फुटबॉल संघाचे अध्यक्ष पंढरी परब, आबा स्पोर्ट्स क्लबचे विश्वास पवार, ठळकवाडी हायस्कूलचे माझी मुख्याध्यापक खांडेकर सर, अजित गरगट्टी,इ रोटरी चे डॉ. फडणीस,गुडी, कॅपिटल वन चे संचालक सदानंद पाटील इ. सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बालिका आदर्श विद्यालयाचे बँड पथक कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सूत्रसंचालन अनूजा तिनईकर यांनी केले तर आभार एन.ओ. डोणकरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बीटा स्पोर्ट्सच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.