आंध्र आणि तेलंगणा सरकार हिंदुविरोधी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर परिसरात ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्याकडे तेलंगण आणि आंध्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे यापुढे हे असे प्रकार रोखावेत व हिंदू मंदिरे आणि धर्म वाढवावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. हिंदू विरोधात षड्यंत्र रचण्यात येत असून केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिंदूंना सहकार्य करावे अशी मागणी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
आंध्र व तेलंगणामध्ये चर्च तसेच मशिदी बांधण्यासाठी सरकार अतोनात पैसा खर्च करत आहे. हा सारा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातून वळवला जात असून याचा विचार करण्याची गरज आहे. मौलवींना दहा हजार आणि ख्रिस्ती फादरना प्रति महिना पाच हजार रुपये देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हिंदूंवरील अत्याचार वाढीचे प्रकार निदर्शनास येत असून याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
तिरुपती मंदिर हे हिंदूंचे आराध्य आणि श्रद्धास्थान आहे. येथे देशभरातून आणि परदेशातूनही भाविक येत असतात. मात्र येथे सध्या ख्रिस्ती धर्मीयांचा वाढत पेव असून याबाबत तेलंगणा सरकार आणि आंध्र सरकार कानाडोळा करीत आहे. त्यामुळे हिंदूंवरील येथील होणारे अन्याय आणि अत्याचार वाढू लागले आहेत. हे सारे अत्याचार अन्याय रोखावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.