Saturday, December 21, 2024

/

चुकीची गोष्ट घडली तर का बोलू नये-नाना पाटेकर यांचा सवाल

 belgaum

मला जर अभिनयाचे माध्यम व्यक्त व्हायला मला मिळाले नसते तर मी आत्महत्या केली असती अभिनयामुळेच मी आहे.आज कोणतीही चुकीची गोष्ट झाली तर त्याबद्दल आपण का बोलत नाही?आपण थडग्यात राहतो का? असा सवाल करत त्यांनी या भिंती तोडायला पाहिजेत.कड्या आपण दरवाजाला नाही तर आपल्या मनालाही आपण घटलोय असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

बेळगावातील लोकमान्य रंग मंदिरात कला महर्षी के बी कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी महोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उदघाटन केल्यावर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा धोंड होते तर व्यासपीठावर चित्रकार रवी परांजपे उद्योजक दिलीप चिटणीस,दत्ता पाडेकर प्रभाताई कुलकर्णी होते.

Nana patekar speech belgaum
Nana patekar speech belgaum

की चित्र ही माझी उर्मी आहे.माझ्या मनातील विचार,तरंग चित्रात काढतो.आपण मनाला मारायला लागलोय.जे जे स्कुल मधील आठवणी सांगताना कलर,पेन्सिल घ्यायला पैसे नव्हते.इतर विद्यार्थ्यांचे सबमिशन करून द्यायचो मग मला त्या पेन्सिल,रंग,पेपर द्यायच्या.

अपमान जे शिकवतो त्याच्यासारखा कोणीही शिकवत नाही.सतत देण्याची माणूस म्हणून जी वृत्ती आहे.ती आपल्याकडे अजून आहे.जलरंगासारखी गंमत नाही.काही वेळा आम्हाला अभिप्रेत नसलेले घडते.सिनेमात रिटेक झोतात ते ऑइल पेंट आहे जलरंग म्हणजे नाटक आहे.इथे रिटेक होत नाही.प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे.के बी कुलकर्णी यांचे नात्याने रवी परांजपे हे ज्येष्ठ सुपुत्र आहे.जोपर्यंत मी रोज मरणार नाहीं तोपर्यंत मी काम करणार असे ते म्हणाले

आज दुफळी माजवण्याची पक्ष पक्षात स्पर्धा लागली आहे.बेरंगा पेक्षा हा रंग बरा असे म्हणून सांगता भाषणाची केली.जगदीश कुंटे यांनी प्रारंभी स्वागत केले तर सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केलं.यावेळी शेकडो कला प्रेमींनी गर्दी केली होती.
तत्पूर्वी पाहिल्या सत्रात वरेरकर नाट्य संघात के बी कुलकर्णी आर्ट गॅलरीचे उदघाटन झाले.त्यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.