अवयवदानाबाबत समाजातील विविध स्तरात जनजागृती करण्यासाठी सुरु असलेली नाशिक ते बेळगाव या पदयात्रेची सांगता शनिवार दि. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30. वा किर्लोस्कर रोड येथील वाडमय चर्चा मंडळ येथे होणार आहे.
दि फेडरेशन ऑफ ऑर्गण ऍड बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे दि. 5 जानेवारी 2020 रोजी नाशिक ते बेळगाव या 775 कि. मी. पदयात्रेत प्रारंभ झाला. या पदयात्रेत 49 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांना गावांना भेट देऊन जनजागृती, करून कोवाडमार्गे उचगाव येथे 21 रोजी सायंकाळी मुक्काम करून दि. 22 रोजी सकाळी ही पदयात्रा बेळगाव येथे पोहोचणार आहे.
सदर पदयात्रेअंतर्गत दिवसभरात बेळगाव शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. जायट्स फाउंडेशन व जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन ), वाड्मय चर्चा मंडळ, मराठी भाषा प्रेमी मंडळ, हिरकणी हायकर्स, सावजी युवा मंच, जीवनविद्या मिशन, या विविध सेवाभावी संघटनाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे,