कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी कर्नाटक गोवा पाणी वाटप म्हादाई वादा बाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. बेळगावात शासकीय विश्राम धामात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न आणि कर्नाटक गोवा म्हादई पाणी तंटा या दोन्ही विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असूनम्हादाई विषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी दिल्लीत आपण चर्चा करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
आगामी दोन महिन्यांमध्ये बेळगाव मधील सुवर्ण सौध मध्ये कर्नाटक मंत्रिमंडळाची बैठक घेण्याबाबत निर्णय घेऊ अशी माहितीदेखील त्यांनी दिली. लवकरच सुवर्ण सौध मध्ये शासकीय कार्यालये स्थलांतर करू असेही ते म्हणाले.
बेळगाव शहरात स्मार्ट सिटी चे चांगले काम झाले आहे अजूनही काम सुरू आहे या पुन्हा पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असलेल्या स्मार्ट सिटी च्या कामांमध्ये लहान-मोठ्या सूचना मी केल्या आहेत.राज्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून बेळगाव वाढत आहे असेही त्यांनी नमूद केलंबेळगाव शहरातील रहदारी समस्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून कंट्रोल आणि कमांड सेंटरचा उदघाटन केलं.
दिल्लीवारी नंतर मंत्रिमंडळ विस्तार
उद्या गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असून राष्ट्रीय भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहोत आगामी दोन-तीन दिवसात कर्नाटक राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल
आता असलेलेच उपमुख्यमंत्री पुढेही राहतील यापुढे उपमुख्यमंत्रीपद असणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलं.
पोट निवडणुकीत जिंकलेले तीन अपक्ष आणि उमेश कत्ती यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाईल असे सांगत सवदी बाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.