शहापूर येथील सरस्वती वाचनालयातर्फे आज रविवारी आयोजित पं. कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलनाचे औचित्य साधून वाचनालयातर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव या यांना 12 वा बेळगाव भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शहापूर कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकूर सभागृहांमध्ये आज सकाळी राज प्रभू धोत्रे यांच्या गायन कार्यक्रमानंतर जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव गाडगीळ यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर समारंभात प्रमुख पाहुणे शेवंतीलाल शहा यांच्या हस्ते विठ्ठलराव याळगी यांना ‘बेळगाव भूषण- 2020’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांची विठ्ठलराव याळगी यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.
याप्रसंगी सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, अॅड. अजय सुनाळकर, जी. बी. इनामदार, उपकार्याध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे, उपाध्यक्ष सदाशिव आरबोळे, कोषाध्यक्ष विजय देशपांडे, कार्यवाह हार एम करडीगुद्दी, सहकार्यवाह जी. बी. इनामदार, संचालक जगदीश कुंटे, मंजुषा गिजरे, स्नेहा सांगलीकर, आनंद कुलकर्णी, कुबेर गणेशवाडी, गणेश कुलकर्णी, वाचनालयाच्या कार्यालयीन व्यवस्थापिका सविता पारनट्टी आदींसह हितचिंतक आणि संगीतप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.