Monday, January 6, 2025

/

तुरमुरी कचरा डेपोमुळे त्रस्त ग्रामस्थांनी अडवल्या कचरा गाड्या

 belgaum

येत्या आठ दिवसात तुरमुरी कचरा डेपोमध्ये क्षमते बाहेर कचरा टाकण्याचे बंद करा, असा इशारा देणाऱ्या संतप्त तुरमुरी (ता. बेळगाव) ग्रामस्थांनी आज कत्तलखान्यातील जनावरांचे टाकाऊ मांस घेऊन कचरा डेपोकडे जाणारे वाहने रोखून रास्तारोको आंदोलन छेडले.

तुरमुरी (ता. बेळगाव) येथील वादग्रस्त कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. सदर कचरा डेपोची क्षमता 100 टन कचरा इतकी आहे, शिवाय या ठिकाणच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने देखील 100 टन कचऱ्याचा करार केला आहे. ही वस्तुस्थिती असताना दररोज तुरमुरी कचरा डेपोमध्ये बेळगाव शहर परिसरातील 100 टनापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 275 टन कचरा टाकला जातो. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून तुरमुरी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात वेळोवेळी अर्ज विनंत्या करून देखील कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संतप्त तुरमूरी ग्रामस्थांनी आज शनिवारी कचरा डेपोकडे टाकाऊ मांस घेऊन जाणारे वाहन रोखून रस्तारोको आंदोलन केले. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समक्ष हा प्रकार घडला.

Turmuri
Turmuri

शहरातील कत्तलखान्यांमधील टाकाऊ मांस कचरा डेपोकडे घेऊन जाणारे वाहन रोखून धरणाऱ्या ग्रामस्थांनी येत्या 8 दिवसात कचरा डेपो टाकण्यात येणाऱ्या 100 टनांपेक्षा जास्त असलेल्या उर्वरित कचऱ्याची पर्यायी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी केली. तसेच आपल्या मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

टाकाऊ मांस घेऊन जाणारे वाहन रोखण्यात आले या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तुरमूरी ग्रामस्थांना उर्वरित कचरा अन्यत्र टाकण्याची पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल असे आश्वासन दिले. सदर आश्‍वासनानंतर रोखुन धरलेले वाहन ग्रामस्थांनी सोडले. आमदारांच्या उपस्थित हा सर्व प्रकार घडल्याने आतातरी तुरमुरी कचरा डेपोमध्ये अवास्तव ज्यादा कचरा टाकणे बंद केले जाईल, अशी तुरमुरी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.