भुंकणाऱ्या कुत्र्यांना आपण चावायचे काय?कोणीतरी खिजगणातीत नसलेली व्यक्ती काही तरी बोलली म्हणून आम्ही त्याला किंमत द्यायची आवश्यकता नाही असे बेताल वक्तव्य महाराष्ट्राच्या नेत्याबाबत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना केले.
बाजूच्या चंदगड तालुक्यातील आमदार बेळगावात येऊन सिमप्रश्नाबाबत भाष्य करतात असे पत्रकारांनी विचारल्यावर उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेजबाबदारपणाचे विधान केले.
दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या राज ठाकरे यांनी काय वक्तव्य केले होते त्याचे स्मरण उद्धव ठाकरे यांनी करावे.अविवेकीपणे बोलणे त्यांना शोभत नाही.कोणीही काहीही म्हणाले तरी बेळगाव हे कर्नाटकचे अविभाज्य अंग आहे.ठाकरेंचं काय कोणीही आले तरी बेळगाव देणार नाही अशी दरपोक्तीही उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली.
सुप्रीम कोर्टात देखील विनाकारण महाराष्ट्र सरकारने याचिका दाखल केली आहे तो कर्नाटक खोडुन काढेल अशी दारपोक्ती त्यांनी केली.त्यांच्या या वक्तव्याचा खुपसर समाचार घेतला जात असून बेळगावात संताप उसळला आहे.अनेकांनी सोशल मीडियावर सवदी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे टोले लगावले आहेत.