राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताहाच्या पार्श्वभूमिवर पोलीस दलाच्यावतीने जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतुक उतर विभाग पोलिसांनी बुधवारी प्रमुख मार्गावर वाहन चालकांना पत्रकांबरोबरच तिळगुळ वाटप केले होते. दरम्यान गुरुवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन बाईक रॅली काढण्यात आली.
वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक नियम व सुरक्षिततेविषयी माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप केले होते. गुरुवारी बाइक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अनेक पोलीस अधिकारी व रहदारी पोलिसांनी भाग घेतला होता.
बुधवारी किल्ला मध्यवर्ती बस स्थानक , कोल्हापुर सर्कलसह शहरातील प्रमुख ठिकाणी वाहन चालकांना पत्रकांबरोबरच तीळगुळ वाटप करुन जागृती करण्यात आली होती.
गुरुवारी सकाळी ७ वाजता आरटीओ सर्कल परिसरातून पोलिसांची बाईक रॅली निघाली असून आरटीओ सर्कलपासून या रॅलीला सरुवात झाली. किल्ला मध्यवर्ती बस स्थानक , चन्नम्मा सर्कल , धर्मवीर संभाजी चोक , गोगटे सर्कलमार्गे टिळकवाडीत जाऊन तेथून पुन्हा ही रॅली आरटीओ सर्कलला पोहोचली.