घरात कोणी नसलेले पाहून घरात चोरट्यांनी लॉक तोडून घरात प्रवेश करत तब्बल तीन घर घरं फोडून हजारोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या दि माहितीनुसार मच्छे भैरवनाथ नगर येथील परशुराम यल्लप्पा निलजकर हे रेणुका देवी यात्रेला गेले आहेत शोभा मनशेट्टी या नातेवाईकांच्या घरी कित्तुरला गेलेत तर भरमानी बाबाजी पाटील हे मूळचे बहाद्दरवाडीचे निवृत्त जवान मच्छे येथे रहातात ते आपल्या गावी गेले होते हे तिघेही घरी नसलेले पाहून चोरट्यानी कुलूप तोडून घरातून प्रवेश केला आणि हजारोंचा रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
आजुबाजूच्या लोकांना सकाळी हा प्रकार निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्णवेणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत पंचनामा केला.श्वान पथक आणि ठसे तज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी चोरट्यांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला.
तिन्ही घरातील मंडळी परगावी गेल्याने नेमकी कितीची चोरी झाली याचा तपशील कळला नसला तरी निवृत्त जवान भरमानी पाटील यांच्या घरातील सात हजारांची रोख रक्कम व दारूच्या बाटल्या देखील लांबवल्या आहेत. तर शोभा मानशेट्टी यांच्या घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली आहे.