सध्या बेळगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटना वाढत असल्या तरी चोरटे सुसाट आपला चोरीचा सपाटा सुरू केला आहे. तर पोलिस सुस्त झाल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे या चोरीच्या घटना थांबणार कधी असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करणे कठीण जात असले तरी या मागे कोण आहे याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या होत असलेल्या चोरी व घरफोड्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी अजूनही पोलिसांना चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. याचा विचार करून पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवून गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. मागील महिन्याभरात पंधराहून अधिक चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी पोलिसांना मात्र याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान यापुढे तरी रात्रीचे गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
अनेक पोलिस स्थानकात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पोलिसांना लक्ष देणेही कठीण बनले आहे. त्यामुळे सरकारने संबंधित पोलिस स्थानकातील पोलिसांची भरती करून घ्यावी याचबरोबर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. त्याठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी त्यामुळे जेणेकरून पोलिसांवरील होणारे ताण कमी होतील आणि तपास यंत्रणेला गती मिळेल याचा विचार करण्याची गरज आहे.