बंद असलेल्या घरांचे दरवाजे फोडून घरातील किमती ऐवज लांबवण्याचे घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे.
नक्षत्र कॉलनी येथे रविवारी सकाळी असाच एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. नक्षत्र कॉलनी येथील रहिवासी असणाऱ्या एंजल अल्मेडा यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.
घर मालक काही कामानिमित्त मागील पंधरा दिवसांपूर्वी गावाला गेले होते . त्यामुळे हे घर बंद होते. चोरट्यांनी पाळत ठेवून चोरीचा हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे रविवारी सकाळी घरातील सदस्य परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.नेमका किती ऐवज चोरीस गेला याचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.