Thursday, April 18, 2024

/

गेट समोर स्नान करत विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन

 belgaum

राणी चन्नमा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर स्नान करून आपला निषेध व्यक्त केला.युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात अनेक विद्यार्थी राहतात.

गेल्या अनेक महिन्यापासून विद्यार्थ्यांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.या बाबत वार्डन आणि अन्य अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही समस्या कायम आहे.

पिण्यासाठी,स्नानासाठी पाणी विद्यार्थ्यांना मिळेना झाले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी बादली आणि तांब्या आणून प्रवेशद्वारा समोर स्नान करून आपला निषेध नोंदवला.आम्ही शिक्षणासाठी आलो आहोत पण पाण्यासाठी आम्हाला वणवण फिरण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी नोंदवली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.