किल्ला तलावा जवळील बुडा कार्यालया नजीक उभारण्यात आलेल्या भव्य ध्वजस्तंभावर 26 जानेवारी रोजी नवा ध्वज फडकविण्यात येणार आहे.
एकशे वीस फूट रुंद आणि 80 फूट उंच आकाराचा ध्वज 110 फुटाच्या ध्वजस्तंभवर फडकविण्यात येत होता.पण जोरदार वाऱ्यामुळे हा ध्वज फाटत होता आणि त्यामुळे तो खाली उतरावा लागत होता.त्यामुळे आता प्रजासत्ताक दिनी फडकविण्यात येणारा ध्वजाचा आकार लहान करण्यात आला आहे.
या आकाराने लहान ध्वजाची किंमत 75000 रु असून असे चार ध्वज महानगरपालिकेने मागवले आहेत.नवा ध्वज जर वाऱ्याला तोंड देऊन टिकला तर तो ध्वज कायमस्वरूपी ठेवण्याचा विचार चालला आहे.





