अपंगांच्या कल्याणासाठी झिजलेल्या शकुताई आता सदैव स्मरणात राहतील असे उद्गार राज्यसभा सदस्य खासदार डॉ प्रभाकर कोरे यांनी काढले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अपंगांच्या कल्याणासाठी सारे आयुष्य शिजवलेल्या शकूताई परांजपे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन आज शांताई वृद्धाश्रमात झाले.
के एल ई चे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य, एसीपी एन व्ही भरमनी या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला .व्यासपीठावर शांताई चे चेअरमन विजय पाटील, व्यवस्थापक नागेश चौगुले, शांताई पाटील कार्याध्यक्ष विजय मोरे हे मान्यवर उपस्थित होते.
विजय मोरे यांनी आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी करत असलेले काम आपल्याला जवळून माहीत आहे. त्याचबरोबरीने के एल ई संस्थेलाही विजय मोरे यांनी मोठी मदत आजपर्यंत केली आहे. असे उद्गार डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी काढले . या वृद्धाश्रमाला आपण नेहमीच मदत करत आलो आहे आणि यापुढील काळातही दोन लाखांची मदत जाहीर केली .
राजेश कुमार मौर्य यांनी बोलताना मोरे सामाजिक कामांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करतात त्यांच्या या कामात आम्ही जरूर मदत करू, आदर्श असे काम विजय मोरे यांनी केले आहे. या कामाची दखल सामाजिक पातळीवर घेतली गेली आणि समाजातून याला मदत मिळते याबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले.
बेळगाव परिसरातील नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते.