बुधवारी रात्री शहापूर विठ्ठल देव गल्ली येथे तरुणावर झालेल्या प्राण घातक हल्ल्या प्रकरणी शहापूर पोलिसांनी चार जणावर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अभिजित भातकांडे वय 39 रा.पाटील मळा बेळगाव या युवकांवर अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करून पलायन केले होते बुधवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली होती त्यात अभिजित हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी शहापूर पोलिसांनी चौघांवर खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.हल्ला करण्यासाठी कोणत्या प्रकारचे धारधार शस्त्र वापरले याचा देखील तपास शहापूर पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी चालवला आहे.
दरम्यान या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अभिजित यांच्या वर उपचार सुरू असून त्यांची तब्येत सुधारत आहे.जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.