बेळगाव पुण्य श्लोक राजमाता जिजाऊ यांच्या ४२२ व्या जयंती निमित्त रविवार दि . १२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मराठा मंदिर येथे सायली गोडबोले – जोशी यांचा ‘ जिजाऊ ‘ हा एकपात्री नाट्याविष्कार होणार आहे .
राजमाता जिजाऊ यांच्या ७६ वर्षे ६ महिने व ५ दिवसांच्या चरित्राचा अभूतपूर्व असा हा कार्यक्रम आहे.श्री शक्ती पुणेतर्फे हा कार्यक्रम होत आहे.
कार्याचा साक्षात्कार घडविणारे ऐतिहासिक असे ‘ जिजाऊ : शोध आणि बोध ‘ हे ७०० पाणी पुस्तक त्यांनी लिहिले आहे . जिजाऊ यांच्यावर त्यांनी ५५० हून अधिक प्रयोग केले आहेत .
कार्यक्रम सर्वांना खुला असून तो तीन तासांचा असल्याने मध्यंतर होणार आहे . याची सर्वांनी नोंद घ्यावी , असे मराठा मंदिरचे अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळाने कळविले आहे .