मराठी माणसावर अन्याय आणि अत्याचार करणार्या कर्नाटकी सरकार अजूनही त्रास देण्यात सुरुवातच केली आहे. नुकतीच बेळगाव येथे समितीने नेत्यांना गोळ्या घाला अशी वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर आणि मराठी विरोधी मंत्र्यांच्या विरोधात तालुका पंचायत मध्ये निषेध करण्यात आला. मराठी सदस्यांनी हा मुद्दा आक्रमक घेऊन असा ठरावही करावा अशी मागणी केली.
मंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री होरटी आणि भीमाशंकर यांनी वाटेल तसे अपशब्द मराठी जनतेबद्दल वापरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी सभागृहात करण्यात आली. तालुका पंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षांकडे ही मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ही अपशब्ध वापरले आहेत. तेव्हा अशा अपमान करणाऱ्यावर ही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
मराठी जनतेवर वारंवार अन्याय आणि अत्याचार करण्यात येत आहेत. त्यामुळे मराठी जनता शांत असली तरी हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. तेव्हा न्यायालय काय निकाल देईल ते समाधान मान्य करण्यावर भर देण्याची गरज असताना काही कन्नड गुंड नको ते वक्तव्य करून सीमाभागातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी सभागृहात करण्यात आली. याचबरोबर सीमाभागातील वातावरण गढूळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी अध्यक्ष शंकर पाटील यांनी सीमाभागात असे कोणतेही वक्तव्य करून येथील मराठी आणि कन्नड भाषिक तेढ निर्माण होणार नाही. आम्ही अजूनही सीमाभागात गुण्यागोविंदाने राहतो. त्यामुळे अशा बेताल वक्तव्यावर कोणीही लक्ष देऊ नये आणि आपल्यातील मतभेद वाढू देऊ नये तसेच या साऱ्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून यामागे कसे आपण राहिलो आहोत तसेच राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्ठेकर, नारायण नलवडे, अप्पासाहेब कीर्तने यांच्याशी इतर सदस्य उपस्थित होते.