Sunday, November 17, 2024

/

सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी गनिमी काव्याची गरज : खा. राऊत

 belgaum

सीमाप्रश्नाची तड लावून कर्नाटक सरकार वर मात करावयाची असेल तर गणिमी काव्याने लढा देणे गरजेचे आहे असा कानमंत्र देण्याबरोबरच महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला दिले आहे.

हॉटेल फेअरफील्ड मेरिओट येथे रविवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली म. ए. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन सीमाप्रश्नी तसेच बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्याय आणि त्या अनुषंगाने अन्य विषयांसंदर्भात चर्चा केली. यावेळी खासदार राऊत यांनी युवा समितीची कार्यपद्धती समजून घेतली तसेच सध्या म. ए. युवा समितीतर्फे सीमाप्रश्न सुटावा यासाठी जे योगदान दिले जात आहे त्याबद्दल तसेच त्यांच्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक व सांस्कृतीक उपक्रमाबद्दल कौतुकोद्गार काढले.

चर्चेप्रसंगी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्यवाह धनंजय पाटील व सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी तसेच त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अन्य समस्या यांची माहिती खासदार राऊत यांना दिली. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आणि मते जाणून घेऊन सध्याची एकंदर परिस्थिती पाहता आपल्याला आता गनिमीकाव्याने सीमालढा लढावयास हवा असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला. तसेच सीमाप्रश्न सोडवणूकिच्यादृष्टीने आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घडवून आणण्याचा निश्चित प्रयत्न करू असे ठोस आश्वासनही त्यांनी दिले.

याप्रसंगी युवा समितीचे विनायक मोरे, किरण हुद्दार, विजय जाधव, धनंजय पाटील,श्रीकांत कदम ,किशोर मराठे ,सिद्धार्थ चौगुले ,विनायक मोरे ,विषाल गौंडाडकर,किरण हुद्दर,शिवाजी मेणसे रोहन लंगरकांडे  विजय जाधव, आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.