गोवावेस ते मराठा सांस्कृतिक भवन या जुन्या महात्मा फुले रोडचे आणि बँक ऑफ इंडिया शहापूर पासून शिवाजी उद्यानातील शिवचरित्र ,जुने पी बी रोड पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.
बेळगाव मनपाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या रुंदीकारणाचे मार्किंग केले आहे. बँक ऑफ इंडिया पासून पोलिस कवाटर्स शिव चरित्र ओल्ड पी बी रोड असा 80 फूट रुंद रस्ता केला जाणार आहे.या गोवा वेस ते मराठी सांस्कृतिक भवन पर्यंतचा रस्ता देखील रुंद केला जाणार आहे.
वरील दोन्ही रस्ते जर रुंद करण्यात आले तर रहदारीचा त्रास कमी होईल यासाठी या रस्त्यांचे रुंदीकारण केले जाणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी या रस्त्यांचे मार्किंग झाले असून गोवावेस ते ओल्ड पी बी रोड असा 80 फुटी रस्ता होणार आहे.या ऐशी फूट रस्त्यामुळे कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.