कला संस्कृती जोपासण्याचे कार्य करणाऱ्या मंडळांना बेळगाव मनपाने शहरातील सरकारी मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे मनपा आयुक्त जगदीश यांनी याकडे लक्ष देऊन ध.संभाजी उद्यान सांस्कृतिक कार्यासाठी मोफत द्यावं अशी मागणी माजी महापौर विजय मोरे यांनी केली.
महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटी आयोजित भव्य खुल्या नृत्य स्पर्धांना शनिवारी सायंकाळी उत्साहात प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते.माजी उपमहापौर रेणू मूतगेकर, भाजप नेते किरण जाधव,यललोजी पाटील,मुख्य आयोजक संजय कडोलकर,मललेश चौगुले आदी यावेळी उपस्थित होते.
धर्मवीर संभाजी उद्यानाला इतिहास आहे सामाजिक सांस्कृतिक कार्या साठी हे मैदान प्रसिद्ध उआहे अनेक मोठ्या लोकांचे चरण स्पर्श या मैदानावर झालाय.राजकीय क्रीडा क्षेत्रात मोठे अनेक जण इथूनच मोठे झालेत.गोव्याचे सभापती राजेश पाटणेकर,स्विमिंग खेळाडू उमेश कलघटगी, राजेश मोरे आदी आहेत.
याच मैदानावर सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांनी नृत्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्यदिव्य अशी नृत्य स्पर्धा ठेवली आहे त्यामुळे भावी काळात बेळगावचे नाव उज्वल करणारे नृत्य कलाकार या मैदानातून येतील अशी देखील आशा त्यांनी व्यक्त केली.महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटी आणि संजय कडोलकर यांनी युवा होतकरू नृत्य कलाकारांना चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे असेही त्यांनी नमूद केलं.
शनिवारी पासून बुधवार 8 डिसेंम्बर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.पाच लाखांची बक्षीस रक्कम या स्पर्धेतील विजेत्यात देण्यात येणार आहे.