राजहंस गडाच्या विकासाला आता प्राधान्य देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. गडावर सध्या समुदाय भवन योजनेतून भवन उभारण्यात येत आहे. तर भव्य दिव्य अशी कमान ही उभारण्यात येत आहे. यासाठी आता नागरिक सज्ज झाले असून याचे कंत्राट कंत्रादार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत थोरवत यांनी घेतले आहे.
येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करणार असे आस्वासन थोरवत यांनी दिले आहे. खासदार अंगडी यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे थोरवत हे ही जबाबदारी लीलया पेलतील अशी आशा ग्रामस्थांना आहे.
भवनासाठी यासाठी ६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . तर खासदार सुरेश अंगडी यांनी स्वत : च्या खर्चातुन १४ लाख रुपये खर्चुन कमान उभारणार असून या कामांचे कंत्राट श्रीकांत धोरवत यांच्याकडे देण्यात आले आहे. बेळगाव तालुक्याची शान असलेल्या राजहंसगडाच्या विकासाला चालना देण्यात आली आहे.
त्यामुळे आता राजहंसगडासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामळे गडाच्या कमान उभारणीसाठी खासदारांनी स्वतः खर्च करण्याची तयारी दर्शविली असून या कामाचे पूजन खासदार यांनी केले आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेतला होता.
काही लोकप्रतिनिधींनी या कामासाठी बऱ्याच धडपडी सुरु केला होता. केवळ आणि केवळ कमिशन मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु होता. मात्र खासदारांनी थोरवत यांच्याकडे हे कंत्राट दिल्याने अनेकांची चांगलीच जिरल्याचेही बोलले जात आहे. आता थोरवत हे येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत