पिरनवाडीच्या होप्स रिकव्हरी सेन्टर असलेल्या चर्चमध्ये संतोष नायक याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.सुनियोजित पद्धतीने त्याचा खून करण्यात आला आहे.
त्याच्या मारेकऱ्यांना पंधरा दिवसात पोलिसांनी गजाआड करावे अन्यथा (प्रार्थना स्थळाला) आग लावू असे खळबळजनक वक्तव्य श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी बेळगावात केले आहे.
संतोष नायक याने आत्महत्या केली असल्याचे भासवले जात आहे.गोरक्षक शिवू उप्पार याच्या हत्येला नऊ महिने उलटून गेलेत पण काही तपास झालेला नाही.
पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याचा आरोपही मुतालिक यांनी केला आहे.मागील काही महिन्यांपूर्वी शिवू उप्पार प्रकरण गाजले होते त्या नंतर आता संतोष नायक प्रकरण पोलिसां समोर आव्हान म्हणून उभे आहे.