Saturday, December 21, 2024

/

‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा शेतकऱ्यांना दिलासा’

 belgaum

बेळगावच्या रिंग रोडसाठी कोणत्याही जमिनीचे भूसंपादन केले जाणार नाही, असे स्पष्ट लेखी विधान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि भूसंपादन अधिकारी यांनी उच्च न्यायालयाकडे सादर केले आहे. यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.हलगा मच्छे बायपासला स्थगिती मिळाल्या नंतर बेळगाव तालुक्यात शेतकऱ्यांना मिळालेला हा दुसरा दिलासा आहे.

बेळगाव रिंग रोडसाठीच्या भूसंपादनास अनेक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून न्यायालयात धाव घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच संबंधित भूसंपादनास स्थगिती आदेश दिला आहे. यापूर्वी कर्नाटक राज्यातील 4/6 लेन (ए) बेळगावी बायपास (पश्चिम) अंदाजे कि.मी. 9.500 पासून ते कि.मी. 515.000 (एनएच 4) (22 कि.मी.) आणि (बी) बेळगावी बायपास (पूर्व) कि.मी. 515.000 (एनएच 4) ते कि.मी. 492.000 (एनएच 4) (न्यू एनएच 48) (33 कि.मी.) साठी जमीन भूसंपादनाची नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि भूसंपादन अधिकारी यांनी यापुढे कोणतीही जमीन भूसंपादन केली जाणार नसल्याचे सांगितले आहे.

बेळगाव रिंग रोडसाठी जी 675 हेक्टर जमीन आवश्यक आहे ती पूर्णपणे सुपीक असून या जमिनीत शेतकरी विविध पिके घेत असतात. ज्या दिवशी सदर जमिनीच्या भूसंपादनाची नोटीस जारी झाली त्या दिवसापासून शेतकऱ्यांनी या भूसंपादन विरुद्ध लढा उभारला होता. आता एनएचएआय आणि भूसंपादन अधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोरील लेखी आश्वासनामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

भुतरामनहट्टी, रामदुर्ग, हलभावी, हेग्गेरे, बंबरगे, हंदिगनूर, महालीनहट्टी, चलवेनहट्टी, केदनूर,मन्नीकेरी, अगसगे, कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गौंडवाडचा कांही भाग, होनगा, बेंडी, सोनट्टी, धरणट्टी, हुडाळी, ओटमाडु (कबलापूर) कबलापूर (भरम्यानट्टी) करविनकुंपी, कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड, बेक्कीनकेरी, अत्तीवाड, मरनहोळ, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी, सुळगे (उचगाव), कल्लेहोळ, उचगाव, बसूर्ते, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी, बेळगुंदी, बोकनूर, सावगाव, मंडोळी, बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, कीणये, कर्ले, नावगे, जानेवाडी, कुट्टलवाडी, संतीबस्तवाड, बहादरवाडी, देसुर, सुळगे (येळ्ळूर), राजहंसगड, झाडशहापूर, धामणे (एस), येरमाळ, खणगाव (केएच), खणगाव (बीके), निलजी, शिंदोळी कांही भाग, बसरीकट्टी, माकनकट्टी, चंदनहोसुर, तारीहाळ, मास्तमर्डी, हालगा, बस्तवाड, शागाना, अत्ती, कोंडसकोप्प, कमकारहट्टी, कोळीकोप्प, काकती (सीटी), सांबरा (सीटी), मुतगा (सीटी), ,,बेनकनहळ्ळी, काकती, मच्छे, पिरनवाडी, बेळगाव, जमुनाळ, शिंदोळी (सीटी), गोकुळनगर, थम्मानायकनहट्टी (धामणे), धामणे, येडूर (सीटी) आणि कणबर्गी या गावच्या शेतजमिनींचे भूसंपादन केले जाणार होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.