बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे एआरटीओ म्हणजेच साहाय्यक आरटीओ अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री सवदी यांच्याकडेच वाहतूक खाते आहे. अथणी येथे एआरटीओ कार्यालय व्हावे आणि अथणी तालुक्यातील लोकांना आपल्या तालुक्यातच वाहना संदर्भातील विविध कामे करता यावीत अशी मागणी वाढली आहे .वाहन परवाना काढण्यासाठी सोय व्हावी अशी मागणी वाढली आहे.
त्यामुळे येथे एआरटीओ ऑफिस सुरू करून अथणी आणि रायबाग तालुक्याची कामे तेथे वर्ग केली जातील ,असे त्यांनी सांगितले. व्यावसायिक आणि शेतकी कामे वाढत आहेत त्यामुळे वाहने घेण्याची संख्या वाढत आहे, त्यामुळे नियम अंमलबजावणी करण्यात आणि नागरिकांना अधिकृतपणे वाहने वापरण्याची सोय होण्यासाठी हे कार्यालय गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अथणी पीएसआय निलंबित
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांनी अथणी पोलीस स्थानकातील पीएसआय उस्मानसाब आवटे यांना निलंबित केल्याची घोषणा केली आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात आला आहे. अनधिकृत वाळू वाहतुकीच्या व्यवसायात दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील नागरिकांनी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीबाबत तक्रारी केल्या असताना असताना आवटे यांनी याकडे दुर्लक्ष केले यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे .
जिल्हा गुन्हे नियंत्रण विभागाने धाड मारून अनधिकृत वाळू वाहतूक करणारे पाच ट्रक जप्त केले आहेत.