जलशुद्धीकरण प्रकल्प सध्या समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत या दुष्काळी भागात अनेक जलशुद्धीकरण प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पुन्हा सुरू करून नागरिकांची सोय करण्यावर भर द्यावा अशी मागणी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर यांनी केली आहे.
नुकतीच येऊन गेलेल्या महापुरामुळे अनेकांना पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागत होते. शुद्ध पाणी नसल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे काहींना तर तब्बल दोन ते तीन किलोमीटर प्रवास करून शुद्ध पाणी आणले होते. अशा परिस्थितीत नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागत होता याचा विचार करून गावागावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभे करावे व नागरिकांची सोय करावी अशी मागणी तालुका पंचायतीच्या बैठकीत नीलेश चंदगडकर यांनी केली आहे.
नुकतीच नुकसान भरपाई म्हणून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गरिबांना नुकसानभरपाई पासून वंचित राहावे लागले आहे तर काहींनी आपल्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देऊन आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे इंजिनियर ही शामील असून ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे धंदे सुरू करण्यात आल्याने गरिबांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे याचा विचार करण्याची गरज असून पुन्हा एकदा तालुक्यात सर्वे करावा आणि गरिबांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणीही निलेश चंदगडकर यांनी केली आहे.
काही ग्राम विकास अधिकारी यांनी तर आपल्या संबंधितांना नुकसान भरपाई म्हणून बक्कळ माया करून देण्याचा प्रकार चालविला आहे. यामध्ये सेक्रेटरी यांचाही समावेश असून ग्रामपंचायतमध्ये असल्या अनागोंदी कारभारामुळे अनेक जण धनिक होत असल्याचा आरोप सभागृहात निलेश चंदगडकर यांनी केला आहे. त्यामुळे याचा विचार व्हावा आणि संबंधितावर कारवाई व्हावी, गरिबांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.