राज्यातील पाच विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यापूर्वीच संबंधितांशी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.
आता राज्याचे पायाभूत विकास सुविधांच्या मुख्य सचिवांनी पाच जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे.
बेळगाव,म्हैसूर,हुबळी,कलबुर्गी आणि मंगलोर या विमानतळाचे नामकरण करण्याचे राज्य सरकारने मनावर घेतले आहे.त्यामुळे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या कडून त्या भागातील प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाची यादी मागवली आहे.
बेळगाव विमानतळाला क्रांतिकारक संगोळी रायण्णा यांचे नाव देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली आहे.आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कडून कोणती नावे पाठवली जातात आणि राज्य सरकार कोणते नाव अंतिम करते हे लवकरच समजणार आहे.
बेळगाव विमान तळ हे उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे असे ब्रिटिश कालीन विमान तळ आहे बेळगाव सह आसपासच्या जिल्ह्यातील लोक या विमान तळाचा वापर करत असतात सध्या दररोज या विमान तळावरून जवळपास 20 विमान झेप घेताहेत त्यामुळे या कुणाचे नाव दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.