मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 654 जवानांचा दीक्षांत समारंभ शनिवारी नेहमीप्रमाणे मोठ्या दिमाखात पार पडला.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या (एमएलआयआरसी) परेड ग्राउंडवर शनिवारी सकाळी आयोजित सदर दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग हे उपस्थित होते. प्रारंभी वाद्यवृंदाच्या तालावर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग यांनी परेडची पाहणी केल्यानंतर उपस्थित 654 जवानांना राष्ट्रध्वजाच्या साक्षीने देश सेवेची शपथ देवविण्यात आली.
प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी युद्धांमध्ये हे कायम विजय प्राप्त करत आले आहेत भविष्यातील युद्धांमध्ये ही ही मराठा नेहमी अग्रभागी असेल मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांचा मुख्य धर्म देशसेवा असून भविष्यात कोणत्याही संकटाला तोंड देते आपली जबाबदारी समर्थपणे करतील असा विश्वास व्यक्त करून लेफ्टनंट जनरल सिंग यांनी सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या.
सदर दीक्षांत सोहळ्यास प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेची शपथ घेतलेल्या 654 जवानांच्या आप्तस्वकीयांसह विविध पदांवरील एमएलआयआरसीचे वरिष्ठ अधिकारी, निमंत्रित पाहुणे, हितचिंतक आणि जवान बहुसंख्येने उपस्थित होते.