सीमाप्रश्न आणि महादाई प्रश्नी उत्तर कर्नाटकातील मठाधिश आणि कन्नड संघटनांचे कार्यकर्ते यांची बैठक शिवाबसव नगर मधील रुद्राक्षी मठात पार पडली.मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बेळगावातील सुवर्ण सौधमध्ये कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी यांची एक उच्च स्तरीय बैठक बोलवून सिमप्रश्नावर विस्तृत चर्चा करावी.
सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे.पण महाराष्ट्र वारंवार सीमाप्रश्न उकरून काढत आहे.त्यामुळे शांतता ,सौहार्दातेला धक्का बसत आहे.पंधरा वर्षं झाली सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे.पण अद्याप त्यावर सुनावणी झालेली नाही.
महाराष्ट्र सीमाभागात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे.यासाठी सीमाभागातील कन्नड संघटनांना सरकारने मदत देऊन बळकट करावे.सीमा संरक्षण समितीचे कार्यालय बेळगावमध्ये स्थापन करावे.सीमा संरक्षण प्राधिकरणावर उत्तर कर्नाटकातील व्यक्तीची नेमणूक करावी अशीही मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये सीमा प्रश्नी बैठक बोलवावी अशी मागणी देखील करण्यात आली.तोंटद श्री श्री सिद्धराम स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विसहून अधिक मठाधिश,कन्नड संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.