कर्नाटक सरकारने जुलमाने बेळगाव सीमावर्ती भागात झालेल्या साहित्य संमेलनात सहभागी व्हायला पायबंद घातला याचा निषेध म्हणून महाराष्ट्राचे राज्य मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी त्याचा निषेध नोंदवला आहे. गेल्या महिन्या भरात महाराष्ट्रातील युवा काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला निषेध आहे.
कदम यांनी ट्विट करून बेळगावात महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकावरील बंदीचा वेगळ्या शब्दांत निषेध केला आहे.शिवसेना राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस देखील बेळगावातील मराठीच्या बाबतीत अग्रेसर झाली असताना महाराष्ट्र भाजपने मात्र मौन साधले आहे.
कर्नाटकात भाजपची सत्ता आहे केंद्रात भाजपची सत्ता असे असताना केंद्रात आपलं वजन वापरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना आवरण्याची गरज असताना महाराष्ट्र भाजप कडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत.महाराष्ट्र भाजप प्रेमी जनतेने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची कान उघडणी करण्याची गरज आहे.महाराष्ट्र मधील भाजप प्रेमी जनता सीमा वर्तीय भागासाठी संवेदनशील नाही का?असा देखील प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलाय.
मागील फडणवीस सरकार हे सीमावर्ती भागासाठी संवेदनशील नव्हते त्यांनी कित्येक वेळी अत्याचार झालेले असतानाही कोणताही निषेध नोंदवला नाही किंवा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांच्या सारखे नवीन मंत्री मंत्रिमंडळातील नवीन चेहरे सीमावर्ती भागासाठी संवेदनशील आहेत हे पाहून सीमावर्ती भागात लोकांच्या उत्साह संचारलेला आहे.
मराठी भाषेची अस्मिता जपणे केवळ बेळगावातील माणसांचेच कर्तव्य नसून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच आद्य कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आज निषेध नोंदवला आहे.त्यामुळे सीमाभागातील माणसांना महाराष्ट्रातील नवीन सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा अधिक प्रमाणात उंचावलेल्या आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिल्यांदाच सीमावर्ती भागासाठी बैठक घेतली आणि त्यानंतर प्रत्येक मंत्री सीमावर्ती भागात घडलेल्या घटना सजग आहे मराठी लोकांचे मनोबल उंचावले आहे.