शहरातील मराठा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पाच संचालकांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्यामुळे आता नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. संचालक पदाच्या या 9 जागांसाठी एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बेळगावच्या सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या मराठा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. दरवेळी मराठा बँकेच्या एकूण 14 संचालक पदांच्या जागांसाठी निवडणूक होत असते. मात्र यंदा निवडणुकीपूर्वीच पांच उमेदवारांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागासवर्गीय (अ) गटात सुनील अष्टेकर, महिला गटांच्या दोन जागांवर जुन्या संचालिका मीना काकतकर आणि नव्या उमेदवार रेणू किल्लेकर, मागासवर्गीय जाती (एससी) राखीव जागेवर शिवबाळ कोकाटे आणि आणि मागासवर्गीय जमात (एसटी) राखीव जागेवर लक्ष्मण नायक अशी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.
उपरोक्त 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यामुळे आता शिल्लक असलेल्या सर्वसामान्य गटासाठीच्या 9 जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सदर 9 जागांसाठी 12 उमेदवार इच्छुक असल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. आपला विजय निश्चित करण्यासाठी या 12 उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
जागांसाठी हे खालील 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
दीपक दळवी, बाळाराम पाटील,बाळासाहेब काकतकर,लक्ष्मण होनगेकर,विनोद हंगीरगेकर,शेखर हंडे,मोहन चौगुले,बी एस पाटील, दिगंबर पवार,पुंडलिक कदमपाटील,दत्ता नाकाडी, मोहन बेळगुंदकर असे उमेदवार रिंगणात आहेत.
मराठी बँकेच्या सत्ताधारी पॅनल मध्ये मोहन प्रकाश चौगुले हे नवीन उमेदवार आहेत सत्ताधारी 9 जणा व्यतिरिक्त मोहन बेळगुंदकर,दत्ता नाकाडी,पुंडलिक कदमपाटील हे सत्ताधारी पॅनल टक्कर देणार आहेत.