Monday, January 13, 2025

/

१२ जानेवारी रोजी कुद्रेमानीत साहित्याचा जागर

 belgaum

कुद्रेमानी येथील बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ आयोजित १४ वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १२ जानेवारी रोजी आयोजित केले आहे.
मुंबई येथील जेष्ठ कवी अशोक बागवे संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत. संमेलन चार सत्रात होणार आहे. उदघाटन सोहळ्यात अध्यक्षीय भाषण , निमंत्रीत कवी संमेलन , प्रबोधनात्मक व्याखान व कथाकथन होणार आहे.

बेळगाव सीमाभागात एक वेगळेपण जाणारं संमेलन म्हणून सुपरिचीत आहे ते कुद्रेमानीचं संमेलन अशी चर्चा बेळगावसह महाराष्ट्रात असते. संमेलनात बेळगांव,खानापूर ,चंदगड , आजरा, गडहिंग्लज येथील रसिक वर्ग उपस्थित राहतात.

केवळ दोन दिवस उरलेले असल्याने संमेलनाची तयारी जोमाने सुरू आहे.पताका लावणे , स्वच्छता , जागृती , मंडप उभारणी , निमंत्रण देणे यासाठी कार्यकर्ते धडपड करीत आहेत.

संमेलनाचे उद्घाटन जि.पं. सदस्या सरस्वती आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

दुसऱ्या सत्रात कविसंमेलनात नाशिकचे कवी विष्णू थोरे , कवी प्रशांत केंदळे व कोल्हापूरचे कवी उमेश सुतार , मानसी दिवेकर सहभागी होणार आहेत.

तिसऱ्या सत्रात कोल्हापूरचे विजय भोसले यांचे “लोक हो, जागे व्हा ! “या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे.
चौथ्या सत्रात शांतीनाथ मांगले यांचे कथाकथन होणार आहे.
या साहित्य संमेलनाचा साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष एम. बी. गुरव व स्वागताध्यक्ष नागेश राजगोळकर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.