कुडची चे आमदार पी राजीव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संविधान योग्य रीतीने जाणून घेतलेले नाही. त्यामुळे ते बेळगाव आणि इतर मराठी भागाला कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र असे म्हणत आहेत. त्यांची विधाने संविधानाचा अपमान करणारी आहेत. असे म्हटले आहे .
जनतेच्या संवेदनांशी खेळणे चुकीचे आहे. ठाकरेंनी बेळगाव संदर्भात असे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे .ठाकरेंनी कर्नाटकातील माणसांच्या भावनांशी खेळू नये. असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करणारे शिवसेना नेते म्हणजे चुकीचे काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यांच्या सावलीची किंमत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.