Wednesday, January 29, 2025

/

यल्लम्माला चालत जाणाऱ्या दोघांना बसने चिरडले-शहापुरची महिला ठार

 belgaum

सौन्दत्ती येथील रेणुका देवीचे दर्शन घ्यायला चालत जाणाऱ्या दोघांना बसने चिरडल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रेणुका देवीच्या यात्रेला चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना बसने चिरडल्याने हा अपघात झाला आहे.यल्लममा डोंगर आणि सौन्दत्तीच्या मधोमध हा अपघात घडला आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार के ए 29 एफ 1187 ही यल्लम्मा डोंगराकडून सौन्दत्ती कडे जात होती चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बसने चालत जाणाऱ्याना धडक दिल्याने एक महिलेसह दोघे जण जागीत ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

 belgaum
Soundatti accident
Soundatti accident

सध्या सौन्दत्ती येथे यात्रा सुरू आहे बेळगाव परिसरातून लाखों भाविक यल्लम्मा डोंगराला दर्शनाला जात असतात सौन्दत्ती हुन यल्लममा रेणुका देवी मंदिरा पर्यंत वाहनांची गर्दी असते बेळगावातील अनेक भाविक सौन्दत्तीला गेले आहेत.शनिवारी देखील बेळगाव भागातून शेकडो भाविक सौन्दत्तीत दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात दोन मयता पैकी एक महिला व एक पुरुष आहेत.निकिता रमेश हदगल वय 25 रा.नार्वेकर गल्ली शहापूर बेळगाव असे मयत महिलेचे नाव आहे तर दुसऱ्या मयताची ओळख पटली नाही.घटनास्थळी सौन्दत्ती पोलीस दाखल झाले आहेत.

 belgaum

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.