बेळगावातील ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या तानाजी चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. चित्रपटाचे पोस्टर या कार्यकर्त्यांनी खाली उतरविण्यास भाग पाडले.
संपूर्ण देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या अजय देवगनच्या तानाजी चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर याने समिती नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यावर शिवसेनेने कोल्हापुरात कन्नड चित्रपट श्रीमन्ननारायण चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडवले होते.
कोल्हापुरात शिवसेनेने कन्नड चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडवले होते त्यामुळे आम्ही कर्नाटकात तानाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका कर्नाटक नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
मराठीला विरोध म्हणून बेळगावातील कनसेच्या मूठ भर कार्यकर्त्यांनी पोस्टर काढून आपला कटू शमवून घेतला.