समिती नेत्यांना कधी गोळ्या घाला तर कधी तान्हाजी चित्रपटावर बंदी घाला तर कधी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव विमान तळावर बंदी घाला अश्या हास्यास्पद मागण्या करणाऱ्या कर्नाटक नव निर्माण सेनेने आणखी एक अशीच मागणी करून टाकली आहे. समिती नेते आणि ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांना अटक करा अशी ही मागणी आहे.
सोमवारी देखील या संघटनेने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकारावर कारवाई करा. अशी आतताई मागणी करत आपला मराठी पत्रकार विरोधी कंडू शमवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रकारांच्या अधिकारावर घाला घालणारी मागणी करणारी कनसे अपरिपक्व असून सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक अशी संघटना आहे. अशा संघटनेला कर्नाटक मधूनच हद्दपार केले पाहिजे अश्लाघ्य,आतताई,बेछूट वक्तव्ये केली जात आहेत. सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेली कनसे सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरत आहे असा देखील आरोप केला जात आहे.
गेल्या दीड महिनाभरापासून या संघटनेने कधी कधी बेळगाव विमानतळावर महाराष्ट्रातील नेत्यांना परवानगी देऊ नये तर कधी तानाजी चित्रपटाला विरोध तर साहित्यिक श्रीपाल सबनीस यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी जागा देऊन मदत करणाऱ्या किरण ठाकूर यांच्यावर कारवाई करा .अशी हास्यास्पद मागणी केली आहे. मराठी नेत्यांना गोळ्या घालायची भाषा करणाऱ्या या संघटनेवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत का बंदी घातली जाऊ नये अशीही मागणी होऊ लागली आहे.
एरवी शांततेत असणारे बेळगाव गेल्या महिनाभरापासून अशांत होऊन बसले आहे .शांतताप्रिय बेळगाव ते जर शांत राहायचं असेल तर कनसे सारख्या संघटना वर नियंत्रण आणणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे. बेळगाव पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.