अमेरिकेतील फिलाडेलया येथील थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी के एल इ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना मानद डॉक्टरेट प्रदान करणार असल्याची माहिती काहेरचे उप कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि.२० मे रोजी होणाऱ्या थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात डॉ.प्रभाकर कोरे यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.
के एल इ संस्थेच्या माध्यमातून कोरे यांनी केलेल्या शैक्षणिक,आरोग्य सेवा आणि संशोधन कार्याची दखल घेऊन मानद डॉक्टरेट थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीने जाहीर केली आहे.अमेरिकेतील जुन्या युनिव्हर्सिटी पैकी ही एक युनिव्हर्सिटी आहे.
के एल इ संस्था आणि या युनिव्हर्सिटीमध्ये समन्वय करार झाला आहे.या करारानुसार शिक्षण आणि संशोधन या बाबत अनेक कार्यक्रम होत आहेत.पत्रकार परिषदेला डॉ .एस.एस.गौडर,डॉ.आर.बी.नेर्ली,डॉ.श्रीनिवास प्रसाद ,सचिव बापू देसाई उपस्थित होते.