बेळगावच्या अष्टपैलू संजय सातेरी याने विजयी षटकार खेचत ऑटोनगर बेळगाव येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात कर्नाटक संघाला प्रतिस्पर्धी आंध्रप्रदेश संघावर 7 गडी राखून शानदार विजय मिळवून दिला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या बेळगाव येथील केएससीए स्टेडियमवर सुरू असलेल्या सी. के. नायडू करंडक 23 वर्षाखालील युवा क्रिकेटपटुंच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पहिल्या डावात 13 धावांची आघाडी घेणाऱ्या आंध्रप्रदेश संघाला कर्नाटक संघाने 7 गडी राखून पराभूत केले. कर्नाटक संघाच्या या विजयास सलामीवीर शिवकुमार बी. व्ही. याच्या शानदार शतकासह 111 धावा आणि मधल्या फळीतील फलंदाज बेळगावचा सुजय सातेरी यांची कणखर फलंदाजी कारणीभूत ठरली.
काल मंगळवारी दिवसअखेर आपल्या 13 धावांच्या आघाडीसह एकूण 187 धावा काढणाऱ्या आंध्रप्रदेश संघाचा दुसरा डाव आज 87.5 षटकात सर्व बाद 228 धावा असा संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना कर्नाटक संघाने 7.5 षटकात 3 बाद 247 भावाकडून सामना जिंकला कर्नाटक संघाच्या अंकित हुप्पा (24 धावा)आणि शिवकुमार (146 चेंडूत 111 धावा) यांनी संघाला 81 धावांची भक्कम सलामी देते विजयाच्या दिशेने नेले. त्यानंतर सुजय सातेरी यांने फलंदाजीतील आपल्या नेहमीच्या आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत 61 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचून कर्नाटक संघाच्या तुझ्यावर शिक्कामोर्तब केले.सुजयने दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा केल्या.कर्नाटक संघाने आपल्या दुसऱ्या डावात 60.5 षटकात 3 बाद 247 धावा झळकाविल्या. आंध्रप्रदेशच्या ए. प्रणयकुमार (30/ 2) आणि के. महीपतकुमार (16/1) यशस्वी गोलंदाजी केली.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे धारवाड विभाग निमंत्रक अविनाश पोतदार आणि माजी स्टेडियम मॅनेजर दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर राष्ट्रीय पातळीवरील चार दिवसाचा कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेचा सामना यशस्वीरित्या खेळविला गेला. या सामन्यासाठी मैदानावरील पंच म्हणून राजीव गोदरा आणि निखिल मेनन यांनी काम पाहिले, तसेच शक्तीसिंग हे मॅचरेफरी होते.